गोल पोस्ट कृषी धान्य खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणी एस.आय.टी. नेमण्याचे आदेश

धान्य खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणी एस.आय.टी. नेमण्याचे आदेश

मुंबई, २९ ऑगस्ट २०२० : भंडारा, गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणी एस.आय.टी. नेमण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

या जिल्ह्रयात बोगस सातबारा दाखवून शेतकऱ्यांना धान्यसाठी मिळणारं अनुदान लाटण्याचा घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून यासंदर्भात तातडीने विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात येऊन दोषींना कठोर शासन करण्यात यावं असंही त्यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.

यासंदर्भात विधानभवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीला भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम तसचं अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, गृह, पणन आणि आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version