गोल पोस्ट गुन्हा मारहाण प्रकरणी चांदगुडेवाडीतील सहा जणांवर गुन्हा दाखल

मारहाण प्रकरणी चांदगुडेवाडीतील सहा जणांवर गुन्हा दाखल

बारामती, 9 ऑक्टोबर २०२०: चांदगुडे वस्तीवर ट्रॅक्टर वळविताना घराजवळ आल्याच्या कारणावरून वडील व मुलाला मारहाण करून जखमी केल्याची घटना चांदगुडेवाडी (ता. बारामती) येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सोमनाथ बाळू भोंडवे (रा. निकटेवस्ती, चांदगुडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. शंकर विठोबा जांबले व दत्तात्रय शंकर जांबले, अक्षय शंकर जांबले, हर्षद गायकवाड, शंकर गायकवाड व सुमीत भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी (दि. ७) रोजी सकाळी दहा वाजता ही घटना घडली. फिर्यादीकडून ट्रॅक्टर वळवताना तो शंकर जांबले यांच्या घराजवळ गेला. त्यावरून आरोपींनी तक्रारदारास शिविगाळ, दमदाटी केली व भोंडवे यांना खोरे, लोखंडी गज, हाताने जबर मारहाण करण्यात आली. फिर्यादीचे वडील बाळू अर्जून भोंडवे यांनाही मारहाण करण्यात आली.

या मारहाणीमध्ये घटनेत तक्रारदाराचे डोके फुटले तर त्यांच्या वडीलांचा डावा खुबा व पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version