पुणेकरांनो सावधान! स्मार्ट मीटरमध्ये फेरफार कराल, तर ‘एका झटक्यात’ पकडले जाल!

वीजचोरी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महावितरणने पुणे परिमंडलात बसवलेल्या स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यास सुरुवात केली आहे. या अत्याधुनिक मीटरमुळे चोरीचा प्रयत्न होताच त्याची माहिती थेट महावितरणच्या सर्व्हरला कळते.

ऑगस्ट महिन्यात अशा ६ प्रकरणांमध्ये चोरी उघड झाली असून, त्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मार्ट मीटरमुळे दिवसा ९ ते ५ या वेळेत वापरल्या जाणाऱ्या विजेवर ८० पैसे प्रति युनिट सवलत मिळते. मात्र, या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. नागरिकांनी ‘महाविद्युत’ ॲपच्या माध्यमातून आपला वीजवापर तपासण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले