हवेलीच्या तात्कालीन भूमी अभिलेख उपअधिक्षक स्मिता गौड निलंबित..!

6

पुणे १३ नोव्हेंबर २०२० :भूमी अभिलेख विभागाच्या हवेलीच्या तत्कालीन उपअधिक्षक स्मिता गौड यांना निलंबित करण्यात आले आहे. शेतीचा नकाशा तयार करताना गैरप्रकार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच ४ लाख ६५ हजार ७४० रुपये धनादेशाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर दबाव आणून काढल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सेवाकाल खंडित झाल्यानंतरही त्या सेवेत स्वतःहून गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले. व जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम यांनी गौड यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत गौड या हवेलीच्या उप अधीक्षक असताना बिनशेती जमिनीचा नकाशा तयार करताना गैरप्रकार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

तळा जिल्हा रायगड येथे उप अधीक्षक पदावर त्यांची १० ऑगस्ट २०२० रोजी बदली करण्यात आली मात्र ११ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या काळात या बदलीच्या ठिकाणी कामावर हजर राहिल्या नाहीत त्यानंतरही ८ नोव्हेंबर पर्यंत स्वतः गैरहजर राहिले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवेली तालुका हा पुणे शहर आणि उपनगरात मोडतो शेती तसेच बिनशेतीच्या शेकडो जागा या तालुक्यात आहेत. मालमत्तांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असा हा तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यात काम करताना अधिकाऱ्यांना अधिक काळजीपूर्वक काम करावे लागते याच पार्श्‍वभूमीवर यांच्याबाबत आलेल्या तक्रारी आहेत. तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणून काढलेली रक्कम हा सर्वच प्रकार सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पातळीवर चर्चेचा विषय आहे ठरला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा