मनालीत बर्फवृष्टी ; देवभूमीत पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याच्या इशारा

हिमाचल प्रदेश, १९ एप्रिल २०२३: पुढचे दोन दिवस हिमाचल प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, गारा पडणार असल्याचा इशारा येथील हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार हिमाचलप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मनालीतील रोहतांग बोगद्यावर देखील मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू असून, येथील टेकड्या बर्फाच्या पांढऱ्या थराने झाकल्या गेल्या आहेत.

श्रीनगर हवामान केंद्राने देखील आज राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २१ एप्रिलपर्यंत जम्मू काश्मीरचे हवामान बिघडण्याची शक्यता देखील विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कुपवाडा, बारामुल्ला, गंदरबल, बांदीपोरा, झोजिला, सोनमर्ग, मीनमार्ग इत्यादी डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाली असल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली आहे.

पुढचे दोन ते तीन दिवस उत्तरेकडील हिमाचल प्रदेशमधील बहुतांश ठिकाणी गडगडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, गारा आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. अशी माहिती येथील हवामान विभागाने वर्तवली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा