गोल पोस्ट महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत १८,३९,४८६ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

राज्यात आत्तापर्यंत १८,३९,४८६ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई, दि. २० जून २०२०: राज्यातील ५२ हजार ४३८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून १ जून ते १८ जून पर्यंत राज्यातील ९६ लाख ३८ हजार २९१ शिधापत्रिका धारकांना ३३ लाख ८० हजार ९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच १८ लाख ३९ हजार ४८६ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४३८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. या योजनेमधून सुमारे १३ लाख १३ हजार ५५४ क्विंटल गहू, १० लाख ८ हजार २५६ क्विंटल तांदूळ, तर १३ हजार ८१७ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या २ लाख ४५ हजार १२९ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. १ जून पासून एकूण ३३ लाख २८ हजार ५४४ शिधापत्रिकांवर मोफत तांदूळ वाटप केले आहे. या श‍िधापत्रिकांवरील १ कोटी ४३ लाख ४६ हजार २५ लोकसंख्येला ७ लाख ४२ हजार ६७० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version