आतापर्यंत २४ लाख नमुन्यांच्या चाचण्या पूर्ण

नवी दिल्ली, दि. १९ मे २०२०: गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे २,३५० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे, आतापर्यंत कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३९,१७४ इतकी झाली आहे. म्हणजेच, सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर ३८.७३ टक्के इतका आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारतो आहे.

देशात  सध्या कोविड-१९ चे ५८,८०२ सक्रीय रुग्ण असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत. या एकूण रूग्णांपैकी सुमारे २.९% रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.

प्रती लाख लोकसंख्येच्या प्रमाणात भारतात मृत्यूसंख्या ०.२ इतकी आहे. तर जगभरातल्या लोकसंख्येचा विचार करता, प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ४.१ मृत्यू इतके आहे.

चाचण्या

देशभरात काल विक्रमी १,०८,२०० नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशात एकूण  २४,२५,७४२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतात जानेवारी महिन्यात कोविड-१९ ची चाचणी केवळ एकाच प्रयोगशाळेत होत होती, आता मात्र आपण अत्यंत जलद गतीने आपल्या चाचणी क्षमतेत वाढ केली असून सध्या देशात ३८५ सरकारी तर १५८ खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांची सुविधा आहे. सर्व केंद्रीय सरकारी प्रयोगशाळा, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये, खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी क्षेत्रे या सर्व ठिकाणची चाचणी क्षमता वाढविण्यात आली आहे. त्याशिवाय, चाचण्यांना गती देण्यासाठी TrueNAT आणि CBNAAT  या आणखी दोन चाचणी किट्स विकसित करण्यात आल्या आहेत.

एम्ससारख्या १४ अग्रणी  वैद्यकीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील प्रयोगशाळांना पुरेशी जैव-सुरक्षा प्रमाणके आणि अधिस्वीकृती करण्यात मदत करण्यात आली आहे. या प्रयोगशाळांमध्ये चाचणीची साधने सतत उपलब्ध राहावीत यासाठी साहित्याचे वाटप करण्याच्या दृष्टीने, भारतीय टपाल आणि खाजगी संस्थांच्या मदतीने १५ डेपो विकसित करण्यात आले आहेत. आधी चाचण्यांची साधने आपण आयात करत होतो, आता मात्र अनेक भारतीय कंपन्यांना ही साधने बनविण्यासाठी पाठबळ दिले जात आहे, यामुळे चाचणीची पुरेशी साधने देशात उपलब्ध आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा