तर आमच्या परवानगी शिवाय त्यांना येता येणार नाही: राज ठाकरे

मुंबई, दि.२५ मे २०२० :  महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारचे कामागरांवरून चांगलेच ट्विटवार रंगले आहे. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, आता उत्तर प्रदेशातील कामगारांना महाराष्ट्रात कामासाठी यायचे असेल तर आमची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही, त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टीकेला राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे.

आता ऊत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचं असेल तर आमची परवानगी घ्यावी लागले, असे विधान मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केले होते. या टीकेला राज यांनी ठाकरे शैलीत उत्तर दिले असल्याने ट्विटर वॉर चांगलेच तापू लागले आहे.

याबाबत ठाकरे यांनी संगीतले की, महाराष्ट्र राज्य सरकारनेही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा, हा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा’ अशा प्रकारची सूचना राज ठाकरे यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील कामगारांचा शिवसेना- काँग्रेस सरकारकडून फक्त छळच झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वर्तणुकीबद्दल माणुसकी कधीही माफ करणार नाही, असे ट्विट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांची ‘सावत्र आई’ म्हणून तरी काळजी घ्यायला हवी होती, असा टोला योगींनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला होता.

त्यानंतर राज ठाकरे यांच्या आजच्या वक्तव्याने योगी आदित्यनाथ यांना चांगलीच चपराक बसेल, असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. यावर योगी काय उत्तर देतात ते आता पहावे लागणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा