मग सरकार काय करते?,शरद पवारांचा संजय राऊतांना प्रश्न……

मुंबई, १० ऑगस्ट २०२० : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून सुशांत सिंग राजपूत प्रकरण हे चांगलंच तापलेलं दिसत आहे. तर महाराष्ट्र विरुद्ध बिहार असे एक रंणागण तयार झाल्याचे चित्र आहे.अशातच नामांकित वृत्तवाहिनीवर एका पत्रकाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रोखठोख प्रश्न करत त्यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला आहे. तर या प्रकरणी आघाडी पक्षातील जेष्ठ नेते शरद पवार यांनी आपले मत नोंदवले.

शरद पवार यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना फोन केला आणि या प्रकरणाबाबत त्यांचा कडे मत व्यक्त केले.
संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात. सोनिया गांधींच्या बाबतीत त्यांनी हेच केले व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानांची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिले. हे सर्व पाहिल्यावर श्री. शरद पवार यांनी मला फोन केला आणि ”एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असते.असा उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी प्रश्न केला, मग सरकार काय करते? पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांत सिंग हे निमित्त व त्या निमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे. असे राऊत यांनी म्हटले.

सुशांत सिंग राजपूत याच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच ढवळाढवळ पहायला मिळत आहे.तर काही वृत्तवाहिन्या याचा फायदा घेत स्वत:चे हित साधत आहेत.आता त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बद्दलाच्या या प्रकरणावर सोशल मिडियात देखील लोकांमध्ये अक्रोश पहायला मिळतोय.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा