वाकावच्या सावंतबंधूनी जपली सामाजिक बांधिलकी

माढा, २ ऑगस्ट २०२०: माढा तालुक्यातील वाकावच्या सावंत बंधूंकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या वाहतुकीसाठी व रूग्णांच्या संपर्कातील लोकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत दोन वाहने दिली.

कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाच्या रुग्णांना वाहतुकीसाठी ॲम्बुलन्स भेट देण्यात आली व कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कातील लोकांना वाहतुकीसाठी एक बस देण्यात आली अशा प्रकारची दोन वाहने देत सामाजिक बांधिलकी जपली. ही दोन वाहने शिवसेना जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्त केली.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून माढा तालुक्यातील रुग्णही वाढत चालले आहेत शिवाजी सावंत यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांना आम्ही आपणास काय मदत करू शकतो असे विचारले असता तहसीलदार राजेश चव्हाण यांनी या अँम्बुलन्स व बस या वाहनांची सध्या खूप गरज असल्याचे सांगितले.

सावंत बंधूंनी लगेच होकार देत आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून या दोन नवीन वाहनांची सोय करून दिली. यामुळे संपूर्ण माढा तालुक्यातून सावंत बंधूंचे कौतुक व आभार मानले जात आहे. यापूर्वीही सावंत बंधूनी कोरोना काळात गरीब लोकांना धाण्याचे किट वाटले होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख शंभू साठे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा