सामाजिक बांधीलकी जपत “या” सोसायट्यांनी केली गरजूंना मदत

पुणे, दि.७ मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील बरीच ठिकाणे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. यामुळे सर्वांचे रोजगार बंद झाले आहेत. हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांची अवस्था तर भयावह होत असल्याचे चित्र दिसत आहे.

याचा विचार करता होरायझन असोसिएशन फॉर लिटरसी अपलिफ्टमेंट आणि सुप्रीम ग्रीनवुड सोसायटी यांनी सामाजिक बांधिलकीतून, दि.४ मे रोजी पुण्यातील मंगळवार पेठ परिसरातील घरकाम व मजुरी करणाऱ्या तसेच निराधार,अपंग अशा गरजू लोकांचा विचार करत, प्रज्वला भिंगारे यांच्या साहाय्याने ३१ गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये गहू, तांदूळ, डाळ, मीठ, चहा पावडर आदींचा समावेश होता.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा