सोशल मीडियामुळे जनतेच्या हाती सत्ता-झुकेरबर्ग

वॉशिंग्टन : फेसबुकचे संस्थापक व सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक लोकशाहीचा पाचवा खांब असल्याचे म्हटले.ते म्हणाले, लोकांनी सोशल मीडिया हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सर्वात प्रभावाशाली माध्यम अाहे, अशा शब्दांत गौरविले आहे. आज साेशल मीडिया समाजाचा पाचवा स्तंभ म्हणून खंबीरपणे उभा आहे. त्यांना आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्यात यशस्वी ठरले आहेत. लोकांना विचार मांडण्यासाठी अन्य कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नाही. फेसबुकमधून आपले विचार थेट मांडू शकतात, असे सांगितले. वॉशिंग्टन येथील जॉर्ज टाऊन विद्यापीठात ते बोलत होते.

हिंसाचार उफाळेल असा मजकूर टाकण्यास परवानगी नाही
राजकीय जाहिरातीच्या सत्यतेची पडताळणी करण्याच्या प्रश्नावर बोलताना झुकेरबर्ग म्हणाले, आम्ही राजकीय जाहिरातीची सत्यता पडताळत नाही. अशा नेत्यांना मदतही करत नाही. आम्ही नेत्यांचे मत लोकांपर्यंत नेण्याचे काम करतो. त्यामुळे लोकांनी कोणत्या नेत्यास निवडून द्यायचे हे लोकांनीच ठरवावे. देशात-जगात हिंसाचार उफाळून येईल, असा मजकूर पोस्ट करण्याची परवानगी आम्ही देत नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा