पुणे, दि.२२मे २०२०: लॉक डाऊनच्या काळात सध्या सर्वजण घरी आहेत. त्यामुळे सोशल मिडिया चांगलाच ऍक्टिव्ह असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर महिला वर्गाकडून वेगवेगळे ट्रेंड करताना पहायला मिळत आहेत. आता सध्या सोशल मीडियावर “नथीचा नखरा” हा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.
या ट्रेंड मधून नथीचा फोटो आपल्या स्टेटसला ठेवून आपल्या जवळच्या मैत्रिणींना चॅलेंज दिलं जात आहे. चॅलेंज मिळालेल्या स्त्रीनं ते स्वीकारुन आपल्या स्टेटसलाही नथ घातलेले स्वतःचे फोटो ठेवायचे असतात.सध्या सोशल मीडियावर हा ट्रेंड भाव खाताना पाहायला मिळतो आहे.
सोशल मीडियावरील व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामचे स्टेटस आता नथींच्या फोटोंनी भरुन वाहिलेले पाहायला मिळत असून महिला वर्गही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहे.
या अगोदर, साडीचा ट्रेंड आला होता, त्यानंतर मुसकुरायेगा इंडिया नावाच्या ट्रेंडने तर सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते.
त्यामुळे सध्या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड सुरू असल्याचे आपण पाहतो, त्यात महिला वर्गाचा मोठा सहभाग असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
या ट्रेंड बरोबर सोशल मिडियावर या ट्रेंडला एक खोचक कोपरखळी सुध्दा मारलेली पाहण्यास मिळत आहे ,
” आता नथीचा नखरा झाला असेल तर नव-या सोबतचा एक फोटो काढून ‘बळीचा बकरा ‘ हा चैलेंज पण होऊन जाऊ दे.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर











































