Pune Samaj Kalyan scholarship : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना’ २०२५-२६ सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत ७५ गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मार्च असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
योजनेची वैशिष्ट्ये :
- अनुसूचित जाती प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
- मुलींसाठी ३०% जागा राखीव.
- विमान प्रवास खर्च, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता आणि आकस्मिक खर्च यांचा समावेश.
- पदव्युत्तरसाठी ३५ वर्षे आणि पीएच.डी.साठी ४० वर्षे वयोमर्यादा.
अर्ज कसा कराल?


- शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करा.
- आवश्यक कागदपत्रांसह अर्ज समाज कल्याण आयुक्तालयात सादर करा.
- भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील अभ्यासक्रमच पात्र असतील.
अधिक माहितीसाठी
- समाज कल्याणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- योजनेच्या अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर सविस्तर माहिती दिलेली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे