गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा समाजसेविका ॲड. अपर्णा रामतिर्थकर यांचे निधन

समाजसेविका ॲड. अपर्णा रामतिर्थकर यांचे निधन

सोलापूर, दि.२८ एप्रिल २०२० : समाजसेविका ॲड. अपर्णा रामतिर्थकर यांचे आज (मंगळवारी) दुपारी निधन झाले. महिन्याभरापासून त्या आजारी होत्या. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सोलापूरमधील ज्येष्ठ पत्रकार (कै.) अरुण रामतिर्थकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात आई, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कामात त्यांचा मोठा पुढाकार होता. अन्यायग्रस्त महिलांसाठी, कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी, निराधार महिलांना आधार देण्यासाठी अपर्णा रामतिर्थकर काम करत होत्या.

निराधार महिलांना आधार देण्यासाठी त्या नेहमीच तत्पर राहायच्या. कौटुंबिक वादातून महिलांचे तुटण्याच्या मार्गावर असणारे संसार त्यांनी समुपदेशातून पुन्हा उभे केले होते. शेकडो निराधार महिलांना त्यांनी आधार दिला. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version