सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी कुल्लूमध्ये गांजाची झाडे केली नष्ट

कुल्लू (हिमाचल प्रदेश), १० ऑगस्ट २०२०: कुल्लूच्या निर्मंद भागात गांजाच्या झाडांची लागवड केली जाते आहे अशी माहिती कळताच तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने निर्मंद भागात जावून रविवारी गांजाची झाडे नष्ट केली. तेथील वातावरणास हरित करण्यासाठी त्यांनी रोपे लावली. त्या लावलेल्या रोपांची संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली आहे.

निर्मंद भागातील स्थानिकांनीही या निर्णयाचे कौतुक केले, अशी मोहीम राबविल्याबद्दल पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. कॅनॅबिस हे त्याचे इंग्रजी नाव असून , ज्याला मराठीमध्ये गांजा म्हणून ओळखले जाते. गांजाचे सेवन केल्याने मानव प्रजातीस हानीकारक आहे. तसेच मुख्यत्वे वैद्यकीय दृष्टया कॅनॅबिस (गांजा) वनस्पतीपासून कॅनाबिस औषध देखील बनविलेले जाते.

आम्ही पोलिसांच्या मदतीने गांजाची रोपे नष्ट केली आहेत आणि आम्ही आज लावलेल्या रोपांची काळजी घेण्याची शपथ आम्ही सर्वांनी घेतली आहे. असे ते म्हणाले .

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा