छत्रपती शिवराय यांचे विचार संकुचित करणाऱ्यांना समाज माफ करणार नाही, ॲड.कृष्णा पाटील यांचे वक्तव्य

कोल्हापूर, २१ ऑगस्ट २०२३ : आपल्या सर्वांचे आदर्श रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत, वास्तववादी व सामाजिक क्रांतीचा इतिहास व्यापक पद्धतीने समजून घेणे, त्यांचे समग्रविचार तत्त्वज्ञान समजून घेणे गरजेचे असून छत्रपती शिवराय यांच्या विचारांना संकुचित करणाऱ्यांना समाज कधीच माफ करणार नाही, असे वक्तव्य ॲड.कृष्णा पाटील यांनी केले. शिवराय फुशांबु ब्रिगेड, भगवा फौंडेशन, निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, आम्ही भारतीय महिला मंच यांच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित पहिली छत्रपती शिवराय विचार जागर परिषदेत ते बोलत होते.यावेळी महाराष्ट्रभर शंभर परिषदांचे आयोजन करण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी नागोजीराव पाटणकर हायस्कूल, कोल्हापूरचे मुख्याध्यापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक व विचारवंत शंकर पुजारी यांना छत्रपती शिवराय विचार प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन ॲड. करुणा विमल यांनी केले. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांची पुस्तके असे होते.

या परिषदेत प्रा.किसनराव कुराडे, भरत लाटकर, अनिल म्हमाने यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सोमवार दि. २ ऑक्टोंबर, २०२३ रोजी दुपारी १२:०० वा. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणाऱ्या “गांधी मरत नसतो” या लघुचित्रपटाच्या प्रीमियर शोच्या पोस्टरचे अनावरण ॲड. कृष्णा पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. शोभा चाळके, सुधीर नलावडे, नितेश उराडे, मोहन मिणचेकर, लता पुजारी, डॉ. कुमार ननावरे, लक्ष्मण माळी, डॉ. चंदनसिंह राजपुत, सुदर्शन शिंदे, डॉ. हाशिम वलांडकर, धनराज पाटील, सुनील ठाकूर, सुनिता जगदाळे, सागर मिसाळ, मोनिका तारमळे, संग्राम मोरे, मोहन कांबळे, डॉ. संदीप गायकवाड, एन. डी. चौगले, सुनील खाकसे, उमेश गाड, सहना अन्नीगेरी, अजित यादव, डॉ. बाबासाहेब पुजारी, धनंजय वाघमारे, नथानियल शेलार, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, नामदेव मोरे, अरहंत मिणचेकर आदी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक छाया पाटील यांनी केले, सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर यांनी केले. तर आभार डॉ. निकिता खोबरे यांनी माणले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा