Why women wear Solah Shringar : माझा लहान पणी खूप वेळा असं माझ्यासोबत होत असायचं ; आई काही तरी करायला सांगायचे अन मी का करू ? हे कारण तिला विचारायचे म्हणजे आई म्हणाली टिकली लाव तर मी विचारलाच पाहिजे.. का ? आई म्हणाली पेरियड्स मध्ये जास्त धावपळ करू नको मी माझा ठरलेला प्रश्न का ? आणि हे फक्त माझा बाबतीत नाही अनेक जण आई ने त्यांचा मना विरुद्ध करायला सांगितलं कि मी का करू ते आधी सांग असं म्हणतात. कधी आई उडवून लावायची तर कधी मला नाही माहिती असं उत्तर द्यायची , कधी मार खाऊन ते करावं लागायचं तर कधी काही तरी इंटरेस्टिंग कारण मला मिळायचं.
जस जस आपण मोठं होत तस आवडत्या गोष्टी मध्ये शृंगार देखील येतो अन त्याच शृंगाराचा कवी अत्यंत अलंकारिक रूपात सादरी करण करतात
नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार
नको करू सखी असा साजिरा शृंगार…
या ओळी तुम्ही देखील ऐकल्या असतीलच आपल्या भारतीय महिलानां सजायला नटायला फार आवडत म्हणजे १६ शृंगारआधीच्या बायका करायच्या असं सांगायचे आता जसा जसा काळ पुढे जातोय हा शृंगार मागे पडलाय हे आपण सगळेच पाहतोय, मी काळ सहजच बाबा ना विचारलं हे इतकं सगळं मलाच का आणि त्यामागे काय ब्र असं विशेष कारण ? त्यावेळी त्यांनी चक्क १६ शृंगार मला समजावून सांगितले. आता हे १६ शृंगार असतात हे सगळ्यांना माहिती आहे पण त्यात नेमकं काय काय असत हे तुम्हाला माहिती आहे का ? हिंदू संस्कृती मध्ये स्त्रियांचे सोळा श्रृंगार त्यांच्या सौंदर्याशी संबंधित असतात. असं इतिहास सांगतो असं देखील म्हणतात कि, त्यांच्या या १६ श्रृंगार केल्याने सौंदर्य तर खुलून येताच पण सोबतच हे श्रृंगार तिच्या प्रिय व्यक्तीला ,तिचे सुखी कौटुंबिक जीवन तसेच त्यांचे दीर्घायुष्य जपण्यास मदत करते आणि यातून एक जरी शृंगार कमी आले तर तो शृंगार अपूर्ण समजला जातो. आपल्या कडे विशेष सणाच्या निमित्ताने, विवाहित स्त्रिया सोळा श्रृंगार करतात, यावेळेस महिला अधिक सुंदर दिसतात. त्यांचे केवळ पौराणिक महत्त्व नाही, तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रत्येक प्रकारच्या श्रृंगाराचा आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो.
श्रृंगारमध्ये अतुलनीय आरोग्याचे रहस्य लपलेले आहे
- केसांमध्ये गजरा / फुले – केसांना स्त्रियांचे दागिने म्हटले जाते, केसांना गजरा आणि फुलांनी सजवणे, त्यांच्या सुगंधाचा मनाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि सुगंधाने मन प्रसन्न आणि आनंदी राहते.
- टिकली / कुंकु – कपाळावर बिंदी लावल्याने व्यक्तिमत्व प्रभावी होते. डोक्याच्या मध्यभागी बिंदी लावल्याने तिसरा डोळा जागृत होतो. बिंदी लावण्याने मनोवैज्ञानिक परिणाम होतो आणि त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास अधिक वाढतो. त्याच वेळी, मन देखील शांत राहते.
- सिंदूर – शरीर शास्त्रानुसार, ज्या ठिकाणी सिंदूर सजवला जातो तो ब्रह्मरंध्र आणि अहिम नावाचा मर्मस्थळाच्या अगदी वर असतं, जे खूप मऊ असतं. येथे सिंदूर लावल्याने या ठिकाणाचे रक्षण होते. याशिवाय सिंदूरमध्ये असे काही घटक असतात जे चेहऱ्यावरील सुरकुत्याचा प्रभाव कमी करतात आणि स्त्रियांच्या शरीरातील विद्युत उत्तेजनावर नियंत्रण ठेवतात.
- हार किंवा मंगळसूत्र – मंगळसूत्र आणि त्याच्या मण्यांमधून बाहेर येणारं वारं महिलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. आयुर्वेदानुसार गळ्यात सोनेरी धातू घातल्याने छाती आणि हृदय निरोगी राहते. याशिवाय त्यात असलेले काळे मोती स्त्रियांचे वाईट नजरेपासून रक्षण करतात.
- कानातले आणि झुमके – कान टोचल्याने दृष्टी सुधारते. खरं तर, कानाच्या खालच्या भागात एक बिंदू असतो ज्याद्वारे डोळ्यांच्या नसा जातात. कानाच्या या बिंदूत छेदतात आणि त्यात कानातले घातल्यावर दृष्टी वाढण्यास मदत होते.
- मांग टिका – डोक्याच्या मध्यभागी घातलेला मांग टिका, स्त्रियांचे सौंदर्य वाढवण्याव्यतिरिक्त, मेंदूशी संबंधित कार्ये संतुलित आणि नियमित ठेवणे.
- बांगड्या आणि ब्रेसलेट – जेव्हा स्त्रियांच्या बांगड्या हातांच्या मनगटावर आदळतात तेव्हा ते शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. यासह, ते स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.बांगड्या हा स्त्रीच्या शृंगारातील एक महत्त्वाचा दागिना मानला जातो. ज्योतिषी माहितीनुसार, ‘हिरव्या बांगड्या घातल्यास बुध देवाचा आशीर्वाद मिळतो, पर्यायाने सौभाग्यवती महिलेला पुण्यफळ प्राप्त होतं. शिवाय बांगड्यांमुळे तिच्या नवऱ्याचं आयुष्य देखील वाढतं. वास्तूशास्त्रानुसार, बांगड्यांच्या आवाजाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते’, असं ते म्हणाले.बांगड्या घालण्यामागे आहे शास्त्रीय कारण? ‘बांगड्यांमुळे महिलांचे आरोग्य सुदृढ राहतं. श्वासासंबंधी, हृदयासंबंधीचे आजार दूर होतात. बांगड्या घातल्यास मानसिक आरोग्य चांगलं राहतं. यामुळे महिलांना अशक्तपणा जाणवत नाही. आपल्या करंगळीच्या खालच्या बाजूला सहा इंचांवर एक्यूप्रेशर पॉइंट्स असतात. या पॉईंटवर दबाव पडल्यामुळे आरोग्य सुदृढ राहतं. म्हणूनच महिलांनी बांगड्या घालाव्या’, असं त्या म्हणाल्या.
- बाजूबंद – बाजूबंद बाहूमध्ये धारण केल्याने हातावर असलेल्या केंद्रांवर दबाव येतो, ज्यामुळे स्त्रिया दीर्घकाळ सुंदर आणि तरुण राहतात.
- कमरबंद – हे परिधान केल्याने स्त्रियांमध्ये हर्नियाचा धोका कमी होतो.
- पैंजण – पैंजण शरीरातील पायांमधून बाहेर पडणारी भौतिक विद्युत ऊर्जा जपते. स्त्रियांच्या उदर आणि खालच्या अंगात चरबी वाढण्यास प्रतिबंध करते. यासोबतच, चांदीच्या पैंजणाचे पायात घर्षण होत असल्याने पायांची हाडे मजबूत होतात.
- जोडवी- जोडवी एक्यूप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करते, ज्यामुळे मज्जासंस्था आणि शरीराच्या खालच्या भागांचे स्नायू मजबूत राहतात. हे एका विशिष्ट शिरावर दबाव टाकते जे गर्भाशयात योग्य रक्त परिसंचरण करते, जे चांगले गर्भधारणा करण्यास मदत करते.
- नथ – नथ घातलेल्या ठिकाणी एक प्रकारचा एक्यूप्रेशर पॉइंट असतो, ज्यामुळे प्रसूतीच्या वेदना दरम्यान वेदना कमी होते.
- अंगठी – बोटांमध्ये अंगठी घातल्याने आळस आणि सुस्ती कमी होते.
- मेंदी – मेहंदी तळवे सुशोभित करते तसेच शरीर थंड ठेवते आणि त्वचा रोग बरे करण्यास मदत करते.
- काजळ – काजल लावल्याने डोळे थंड होतात आणि डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
- लाल किंवा हिरव्या रंगाचे कपडे – सणासुदी गडद रंगाचे कपडे परिधान केल्याने सौंदर्य वेगळंच उठून दिसतं.
वेबदुनिया वर वाचा :
हे होते १६ सखीचे साजिरे शृंगार आता काही लोक यावर विश्वास ठेवतात तर काही नाही पण माझा मते जुन्या काळात ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यात काही ना काही तरी तथ्य हे आहेच आता तुमचा पर्यन्त ते पोहोचताना तथ्य पोहोचलं कि मौखिक संवादात कुठे तरी भटकलेली अंधश्रध्दा हे तुम्हाला ठाऊक.
– ऐश्वर्या राजेश शिलवंत















































