गोल पोस्ट महाराष्ट्र सोलपूर महामार्गावर अपघातात नगरमधील तीन जण ठार

सोलपूर महामार्गावर अपघातात नगरमधील तीन जण ठार

नगर : सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी (ता. नगर) शिवारामध्ये एसटी बस व चारचाकी मोटारीच्या भीषण अपघातात ३ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत.
मृतांमधील तिघेही नगरचे रहिवासी आहेत.
अरुण बाबुराव फुलसुंदर (वय ३०, रा. बुरुडगाव), अर्जुन योगेश भगत (वय १४, रा. सिव्हिल हडको) व तारा शंकर भगत (रा. नगर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
अक्कलकोट येथून मालेगावकडे जाणारी बस ही अंबिलवाडी शिवारामध्ये आली असता समोरून येणाऱ्या चाकी मोटारीवर जोरात धडकली.
यामध्ये मोटार गाडीचा चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मोटारीतील जखमींना जिल्हा रुग्णालयांमध्ये पुढील उपचारासाठी आणले आहे.
या अपघातानंतर नगर-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. : सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी (ता. नगर) शिवारामध्ये एसटी बस व चारचाकी मोटारीच्या भीषण अपघातात ३ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत.
मृतांमधील तिघेही नगरचे रहिवासी आहेत.
अरुण बाबुराव फुलसुंदर (वय ३०, रा. बुरुडगाव), अर्जुन योगेश भगत (वय १४, रा. सिव्हिल हडको) व तारा शंकर भगत (रा. नगर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
अक्कलकोट येथून मालेगावकडे जाणारी बस ही अंबिलवाडी शिवारामध्ये आली असता समोरून येणाऱ्या चाकी मोटारीवर जोरात धडकली.
यामध्ये मोटार गाडीचा चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मोटारीतील जखमींना जिल्हा रुग्णालयांमध्ये पुढील उपचारासाठी आणले आहे.
या अपघातानंतर नगर-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version