सोलापूर भाजपच्या माजी नगरसेवकाने भरले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे एस टी भाडे

सोलापूर १ जुलै २०२० : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे एस टी भाडे संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानाने एस टी महामंडळाला भरले हि बाब जेंव्हा सोलापूरातील भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांना पेपर मधील बातमीतून कळाल्यावर त्यांनी संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांच्याशी संवाद साधून आपल्याला आकारलेले ७१ हजाराचे एस टी भाडे मी माझ्याकडून सोलापूर जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या कडे सुपुर्त करीत आहे असे सांगून ७१ हजार रूपयाचा धनादेश त्यांनी जिल्हाधिका-यांकडे सुपुर्त केला.

यावेळी बोलताना अनंद जाधव म्हणाले की, ” दरवर्षी महाराष्ट्रातूनच नाही तर इतर राज्यातनू अनेक वारकरी पंढरपुरात दर्शनाला येतात. परंतू सध्या या कोरोना वायरसमुळे सरकारने काही निर्बंध घातले. परंतू वारकरी संप्रदायाचे कौतुक केले पाहिजे कारण त्यांनी कुठली ही तक्रार न करता सरकारचे सर्व नियम पाळले. सरकारने पालख्या हेलिकॉप्टरने घेवून जावू या सारख्या बड्या बड्या गप्पा मारल्या परंतू लोकसहभागातून कसलाही खर्च न होता होणारी निवृत्तीनाथांची पायी वारी यावर्षी मात्र सशुल्क करावी लागली. तीन दिवसाच्या मुक्कामासाठी एस टी महामंडळाने निवृत्तीनाथ संस्थान कडून ७१००० रूपये भाडे आकारले . शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची असंवेदनशील समोर आली आहे.

ते पुढे म्हणाले की, मागच्या वर्षी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वारक-यांसाठी ५ लाख रेनकोटची व्यवस्था केली होती परंतू हे सरकार वारक-यांविषयी उदासीन व असंवेदनशील असल्याचे दिसून येते. आणि म्हणून मी माझ्या वाढदिवसानिमित्त संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान कडून सरकारने आकारलेले ७१००० रूपयाचे एस टी भाड्याचे पैसे माझ्याकडून देत आहे. सदर रकमेचा धनादेश मी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी अमरनाथ भिंगे यांच्या कडे सुपुर्द केला आहे .

यावेळी सागर अतनुरे, संदिप जाधव, अक्षय अंजीखाने, सागर नागणकेरी आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा