सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना समोर येत आहेत. दिल्लीमध्ये तर मागील दोन महिन्यांमध्ये आगीच्या तांडवात बऱ्याच जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. कंपन्या किंवा कारखाने यांच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने असा आगीन वर नियंत्रण मिळवणे कठीण जाते.
कंपन्यांमधील या निष्काळजीपणामुळे अशा आगीचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर मधील आहे. सोलापूर मधील सुरेगाव येथील ही घटना आहे. या गावातील पिसे इंडस्ट्रीजला भयंकर आग लागली आहे. पिसे इंडस्ट्रीजला लागलेली ही आग अद्यापही तशीच चालू आहे. ही आग पहाटे पाच वाजता लागली होती.
आग लागल्याची बातमी मिळताच अग्निशामक दल संबंधित ठिकाणी त्वरित आले. अग्निशामक दलाने आग विझविण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे तथापि अजूनही ही आग धगधगत आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांची संपत्ती जळून खाक झाली आहे. लागलेल्या भीषण आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.