रशियाला विरोध दर्शविण्यासाठी युक्रेन आर्मीच्या सैनिकांचा ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स

मायकोलायव्ह, युक्रेन ६ जून २०२३ : युक्रेन आर्मीच्या काही सैनिकांनी आरआरआर चित्रपटातील ऑस्कर विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला आहे. युक्रेनच्या जवानांनी या व्हिडिओमध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या स्टेप्सची हुबेहूब कॉपी केली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. युक्रेनच्या मायकोलायव्ह शहरात याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. युक्रेन (LDLU) च्या लिबरल डेमोक्रॅटिक लीगचे उपाध्यक्ष जान फेडोटोव्हा यांनी हा व्हिडिओ शेअर केला. नंतर तो RRR चित्रपटाच्या अधिकृत खात्यावरूनही शेअर करण्यात आला.

या व्हिडिओमध्ये युक्रेन आर्मीचे जवान रामचरण आणि ज्युनियर एनटीआर प्रमाणेच पदलालित्य दाखवत नृत्य करत आहेत. हे गाणे RRR चित्रपटात या दोघांवर चित्रित करण्यात आले होते. विषेश म्हणजे RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याचे चित्रीकरण युक्रेनमधील राष्ट्रपती भवनातच करण्यात आले होते. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी राजामौली यांच्या टीमने येथे हे गाणे शूट केले होते. राजामौली यांनी यासाठी युक्रेन सरकारची विशेष परवानगी घेतली होती.

चित्रपटाच्या मूळ गाण्यात मुख्य अभिनेते राम चरण आणि ज्युनियर एनटीआर ब्रिटिश अधिकाऱ्यांचा विरोध करताना दिसले. तर युक्रेन आर्मीच्या सैनिकांनी या गाण्याच्या माध्यमातून रशियाचा निषेध व्यक्त केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा