“लैंगिकतेवर वाचू काही”(कंडोम भाग १), कंडोम फाटल्यावर करणार काय?

पुणे, ९ जानेवारी २०२१: नमस्कार प्रेक्षकहो आज आपण आपल्या लैंगिकतेवर वाचू काहीच्या नविन भागात कंडोम विषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्याचे पाच भाग आहेत. ज्या मधे तुम्हाला सर्व माहीती मिळेल.

भारतासारख्या प्रगत देशामध्ये आजही लैंगिकतेला घेऊन फार गैरसमज आहेत. तर या विषयावर स्पष्टपणे बोलणारा वर्ग हा कमीच आहे आणि या कमी बोलणाऱ्या वर्गाकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण, अश्या विषयावर खुलेआम आणि बेधडक चर्चा झाली पाहिजे.

“कंडोम” सुरक्षित सेक्स करण्यासाठी, लैंगिक आजारापासून बचावासाठी, अनावश्यक गर्भधारणा होऊ नये म्हणून याचा वापर केला जातो. तसे कंडोम या गोष्टी साठी वापरणे अनिवार्यच आहे. म्हणून त्याच्या वापरण्याची माहिती आसणे गरजेचे आहे.

कंडोम घालताना आणि काढतना काळजी घेणं गरजेचं आहे. लिंगाची ताठरता असेपर्यंतच कंडोम काढायला हवा नाही तर तो स्त्रीच्या योनीमार्गात आडकण्याची शक्यता आहे आणि ते फाटण्याचीही. तुमच्या याच चुकी बद्दल आणि कंडोम फाटल्यावर काय करण्याच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

कंंडोम फाटल्यावर करण्याच्या गोष्टी:

जर तुम्हाला कळाले की कंंडोम फाटले आहे, तर परिस्थितीचा ताबा घ्या आणि सेक्स करणे थांंबवा. कारण सेक्स करणे न थांंबवल्यास गर्भधारणा होऊ शकते. तुमच्या भावनांंवर ताबा ठेवण्याने नात्यातील विश्वास कायम राहतो.

१. अशावेळी स्त्रियांंनी मुत्रविसर्जन करावे आणि मुत्राशयाजवळ शुक्राणु असल्यास ते पाण्याने स्वच्छ करा. योनी स्वच्छ करु नये त्यामुळे शुक्राणु मुत्राशयातुन शरीरात जाऊ शकतात.

२. यावेळी सेक्स केल्यानंंतर एमरजेंसी कॉंंट्रसेप्टीव किंंवा मॉर्निंंग आफ्टर पिल घेणे योग्य ठरते. म्हणजे अनावश्यक गर्भधारणा होणार नाही. जर तुम्ही बाळाचा विचार केला नसेल तर गर्भनिरोधक गोळी घेण्यास  विसरु नका.

३. पुरुषांंनी अशावेळी एसटीडी किंंवा लैंंगिक आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांंकडुन तपासणी करुन घ्यावी. स्त्रियांंनी देखील या लक्षणांंची दक्षता घ्यावी.

४. वरील परिस्थितीनंंतर स्त्रियांंची पाळी चुकली तर त्यांंनी एका आठवड्यानंंतर होम प्रेगनेंंसी टेस्ट करावी.

६. पुन्हा कंंडोम फाटणार नाही याची काळजी घ्यावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा