गोल पोस्ट महाराष्ट्र उदगीर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर यांच्या मुलाचे अपघाती निधन

उदगीर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर यांच्या मुलाचे अपघाती निधन

उदगीर, लातूर, ९ जानेवारी २०२४ : उदगीर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले आहे. पुण्यावरून येत असताना लातूर जिल्ह्याच्या आशिव रोडवर अपघात झाला असून या भीषण अपघातात प्रसाद राजेश्वर निटुरे यांचे दुःखद निधन झाले आहे. भर रस्त्यात एक टेम्पो नादुरुस्त अवस्थेत उभा होता. त्यावेळी लातूरकडे जाणाऱ्या प्रसाद निटुरे यांची कारने टेम्पोला धडक दिली. या भीषण धडकेत प्रसाद निटुरे याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उदगीर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून उदगीर शहरात शोकाकुल वातावरण पसरलेले आहे. सदर अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज हे माध्यमावर व्हायरल झालेला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : महादेव रोडगे

error: Content is protected !!
Exit mobile version