सोनीपत, 11 नोव्हेंबर 2021: हरियाणातील सोनीपत येथे राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू निशा दहियाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी निशाशिवाय तिचा भाऊ आणि आईलाही लक्ष्य केले. या हल्ल्यात निशासोबत तिच्या भावाचाही मृत्यू झाला. तर तिच्या आईला गंभीर अवस्थेत रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
ही खळबळजनक घटना सोनीपतच्या हलालपूर गावातील आहे. जिथे कुस्तीपटू सुशील कुमारच्या नावावर एक अकादमी आहे. तेथे हल्लेखोरांनी ही घटना घडवली. हल्लेखोरांनी निशा दहिया, तिचा भाऊ सूरज दहिया आणि आई धनपती यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला.
हल्ला करून अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. निशा आणि तिचा भाऊ सूरज यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आई धनपती यांना गंभीर अवस्थेत रोहतक पीजीआयमध्ये पाठवण्यात आले आहे. जिथे त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोनीपत पोलिसांनी निशा आणि सूरजचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. या हायप्रोफाईल दुहेरी हत्याकांडाचा तपास आता पोलीस स्टेशन खरखोडा यांनी सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासत आहेत. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे