बारामती (प्रतिनिधी) :सोनगाव (ता.बारामती) येथील विद्यमान सरपंच जयश्री युवराज थोरात यांच्या पतीची ऐन संक्रांतीदिवशी धारदार शस्त्राने वार करुन हत्या. खून झालेल्या व्यक्तीचे नाव युवराज थोरात (वय ५०) असे आहे.
सोनगाव येथील सोनेश्वर मंदिरात आज महिला मकर संक्रांती मुळे मोठ्या संख्येने हळदी कुंकू व ओवाळायला येत होत्या, त्यावेळी एक युवक त्या महिलांच्या छेडछाड करत असताना त्याला सांगायला गेलेल्या युवराज थोरात यांच्यावर या तरुणाने धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार करून त्यांचा खून केले, या घाटाने नंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.या घटनेमुळे संतप्त झलेल्या गावकऱ्यांनी वार केलेल्या युवकांच्या वस्तीवर हल्ला करत येथील घरांना आग लावली आहे. या आगीमध्ये कोणतीही दुर्घटना झाली नसल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले.