गोल पोस्ट इतर राजकारण सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली, ३ सप्टेंबर २०२३ : काँगेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. सोनिया गांधी यांना सौम्य तापाची लक्षणे जाणवल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. अशी माहिती त्यांच्या जवळच्या सुत्रांनी सांगितले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या रुग्णालयांतील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत कोविडनंतर त्यांची प्रकृती अनेक वेळा खालावली आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version