दुबई , दि. २३ जून २०२० : बॉलिवूड गायक सोनू निगम हा सध्या आपल्या मुला सोबतच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी परिवार वादावर टीका केली आहे. अशा परिस्थितीत गायक सोनू निगमनेही काही व्हिडिओ सामायिक करून संगीत उद्योगातील ‘माफिया’ बद्दल बोलले आहे. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सध्या तो आपल्या मुलाबरोबर मजा करताना दिसत आहे.
सोनू निगमने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलासह दुबईच्या मॉलमध्ये फिरत आहे. सोनू मुलासह दुबईच्या मॉल ऑफ अमिरात येथे आला. त्याने मास्क घातला होता, ज्यामुळे तो ओळखला जाऊ शकला नाही. सोनूने व्हिडिओ बनवून चाहत्यांना सांगितले की जग पूर्णपणे बदलले झाले आहे. तथापि, ही चांगली गोष्ट आहे की मला कोणीही ओळखू शकले नाही. हे ऐकून सोनूचा मुलगा हसला.
भूषण कुमारवर बनवला व्हिडिओ
सोनू निगम गेल्या काही दिवसांपासून संगीत उद्योगाबद्दल बोलत होता. त्याच्या या वक्तव्यामुळे इंडस्ट्रीतही खळबळ उडाली आहे. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सोनू निगमने टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांनाही लक्ष्य केले होते, त्यानंतर भूषणची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हीने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
सोनू निगम यांनी आपल्या ताज्या व्हिडिओत म्हटले आहे की, ‘लाथों के भूत बातों से नहीं मानते ‘. मी कोणतेही नाव घेत नाही आणि मोठ्या आपुलकीने सांगितले की तुम्ही सर्वांनी नवीन कलाकारांवर प्रेम केले पाहिजे. एखाद्या कलाकाराने आत्महत्या करून नंतर सर्वांनी त्यावर शोक व्यक्त करत रडण्यापेक्षा त्याआधीच एकमेकांसोबत आपुलकीने राहून ती वेळच न येऊ देणे कधीही चांगले आहे. पण काय करणार हे तर संगीत विश्वातील माफिया आहेत ते माफियाचेच काम करणार. विशेष म्हणजे मी माझ्या व्हिडिओमध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नव्हते. परंतू काही लोक स्पष्टपणे माझे नाव घेऊन माझ्याविषयी बोलत आहेत.
यानंतर सोनूने आणखी काही गोष्टी बोलल्या आणि त्यानंतर टी सीरीजचे मालक भूषण कुमार यांच्यावर वक्तव्य केले. भूषण विषयी बोलताना सोनू म्हणाला, भूषण कुमार, आता मला तुझे नाव घ्यावे लागेल आणि हो तुझे नाव एकेरी ‘तू’ अशा शब्दांमध्ये मला घ्यावे लागेल. हे लक्षात ठेव की तू चुकीच्या माणसांसोबत वैर घेतले आहे. जेव्हा तू माझ्या घरी आलास तेव्हा तू विसरलास ‘भाई माझा अल्बम करा, भाई दिवाना अल्बम करा, भाई माझी सहारा श्री शी ओळख करुन द्या, स्मिता ठाकरे यांची माझी ओळख करुन द्या , भाई बाळ ठाकरे यांची ओळख करुन द्या , भाई अबू सालेम.. तुला आठवते का हे सर्व? अबू सालेमपासून वाचवा, भाई अबू सालेम शिवीगाळ करीत आहे. तुला या सर्व गोष्टी आठवतात की नाही? मी तुला एवढेच सांगू इच्छित आहे की तू माझा वाटेला जाऊ नकोस.
त्याला उत्तर देताना भूषणची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिने प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणाला की टी-सिरीज मुळे सोनूला ब्रेक मिळाला असून आज त्याच्या विरोधातच तू बोलत आहेस. दिव्याने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘सोनू निगम जी टी-सीरिजने तुम्हाला इंडस्ट्रीत ब्रेक दिला होता … तुम्हाला वरपर्यंत नेले … जर तुम्हाला इतका द्वेष होता तर तुम्ही या आधी भूषणपुढे का बोलला नाही … आज प्रसिद्धीसाठी का बोलत आहात?
न्यूज अनकट प्रतिनिधी