वाराणसी, २ सप्टेंबर २०२०: अभिनेता सोनू सूद यांनी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत असंख्य लोकांना मदतीचा हाथ दिला आहे. सर्वात आधी त्यांच्याकडून मजुरांना घरी पोहोचवण्याचं कार्य करण्यात आलं. मार्च महिन्यापासून सुरू असलेली टाळेबंदीनंतर सध्या अनलॉक नुसार सर्व गोष्टी हळू हळू उघडत आहेत. त्यातच काशितील नावाडींसाठी कमाईची संधी होती. पण गंगा नदीला पुर आल्याने स्थानिक जिल्हा प्रशासनाने १५ सप्टेंबर पर्यंत नौकाविहार करण्यास बंदी घातली आहे.
सध्या काशीतील ही समस्या पाहता तेथील सामाजिक कार्यकर्ते दिव्यांशु उपाध्याय यांनी सोनू सूद यांना टॅग करून सर्व माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. वाराणसीत ८४ घाट असून ३५० नावाडी कुंटुंब आहेत.
आता त्यांना आणि त्यांच्या मुलांना उपाशीच झोपावं लागेल, अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती. या ट्विटला सोनू सूद यांनी उत्तर दिलंय. वाराणसीच्या घाटावरील ३५० कुटुंबातील कोणताही सदस्य उपाशी झोपणार नाही. आज मदत पोहोचेल, असं सोनू म्हणाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे