मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सोनू सूद मातोश्रीवर

मुंबई, दि. ८ जून २०२०: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री येथील त्यांच्या निवासस्थानी गेले. सोनू सूद यांच्यासमवेत काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विद्यमान वस्त्रोद्योग मंत्री असलम शेखही मातोश्रीवर पोहोचले. ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्यासाठीच सोनू सूदला पुढं केलं जात आहे अशी टीका राऊत यांनी केली होती. त्यानंतर काल संध्याकाळी सोनू सूदनं मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

या बैठकीनंतर संयोजक राऊत यांनी एक ट्विट केले आणि लिहिले की, ‘शेवटी सोनू सूद यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता मिळाला’. संजय राऊत यांच्या या ट्विटनंतर आदित्य ठाकरे यांचे विधानही आले. आदित्य ठाकरे यांनी सोनू सूदला चांगली व्यक्ती म्हटले. आदित्य ठाकरे म्हणाले, आज (रविवारी) संध्याकाळी सोनू सूद यांनी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री असलम शेख यांच्यासमवेत आमची भेट घेतली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आमच्यात कोणतेही गैरसमज नसल्याचं सोनू सूद यांनी म्हटलं आहे. तसेच, काही वेळापूर्वी त्यांनी मराठीत ट्विट करत ‘स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे. स्थलांतरित मजुरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाहीये. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावलं त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलंय.’ असं म्हटलं आहे.

अभिनेता सोनू सूदने देशभरात हजारो मजुरांना घरी पोहोचविले आहे. परप्रांतीय मजुरांना घरी पाठविण्यात मदत करण्यासाठी फिल्म स्टार सोनू सूद यांनी मदत केल्याबद्दल राजकारणाला प्रारंभ झाला आहे. शिवसेना मुखपत्र सामना मध्ये सोनू सूद यांना भारतीय जनता पक्षाची कठपुतळी म्हणून वर्णन केले आहे.

काय म्हणाले होते राऊत

खासदार संजय राऊत यांनी सोनूच्या सगळ्या कामाला अभिनय म्हटले आहे. या अभिनयामागे कोणत्यातरी राजकिय व्यक्तीचा हात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो?, करोनाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो?’ अशी शंकाही त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या लेखातून उपस्थित केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा