सोन्याने मारली २३७ रुपयांची मुसंडी, चांदीत ७४० रुपयांची घसरण

12

नवी दिल्ली, दि. ३ जुलै २०२० : एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीतील सोन्याचे दर शुक्रवारी २३७ रुपयांनी वाढून ४९,०२२ रुपयांवर गेले. आधीच्या व्यापार सत्रात सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ४८,७८५ रुपयांवर बंद बंद झाले होते. याच बरोबर चांदी ७४० रुपयांनी घसरून ४९,०६० रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १,७७४ डॉलर तर चांदीचा भाव प्रति औंस १७.९९ डॉलर होता. सध्या कोविड -१९ चे संकट असल्यामुळे जगामध्ये आर्थिक मंदीचे सावट उमटले आहे. आर्थिक मंदीच्या काळामध्ये सोन्याचा भाव हा नेहमीच वाढत राहिला आहे तो या वेळी देखील बघण्यास मिळाला आहे. यावर्षी सोन्याचा भाव चक्क ५०,००० ला टेकला आहे.

मंदीच्या काळामध्ये सोने हे नेहमीच विश्वसनीय गुंतवणूक मानले जाते. मंदीच्या काळामध्ये देश सुद्धा राखीव निधी म्हणून सोन्याची जास्त खरेदी करताना दिसतात. सध्याच्या काळात सोन्याच्या दरांमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी