सौदी अरेबियात होणार जगातील सर्वांत उंच इमारत

दुबईमध्ये असणारी “बुर्ज खलिफा” ही सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते. या इमारतीची उंची तब्बल ८२८ मीटर इतकी आहे. परंतु येणाऱ्या पुढील वर्षात जगातील सर्वात उंच इमारत बाधंण्यात येणार आहे. ही इमारत बुर्ज खलिफापेक्षा ६०० फूट उंच असणार आहे. म्हणजे त्याची उंची १००० मीटर पेक्षा जास्त असणार आहे. या इमारतीला जेद्दा टॉवर किंवा किंगडम टॉवर असे नाव देण्यात आले आहे.

सौदी अरेबियातील रियाध येथे ही इमारत बाधंण्यात येत आहे. या इमारतीची उंची ही बुर्ज खलिफाहुन १८० मीटरपासून ५९१ फुट उंच असणार आहे. ही इमारत बाधंण्यासाठी ८७९७ कोटी रुपये लागणार आहे.

जेद्दा इकोनॉमिक कंपनीचे अध्यक्ष सौदी प्रिन्स अलवलीद बिन तलाल ते या इमारतीचे मालक आहे. जेद्दा टॉवरची डिजाइन सुप्रसिद्ध वास्तुकार एड्रियन स्मिथ व गॉर्डन गिल यांनी तयार केले आहे. जगातील ११ उंच इमारतींपैकी ४ इमारतीचे डिजाइन गॉर्डन गिल यांनी तयार केले आहे. तसेच बुर्ज खलिफाचे ही डिजाइन गॉर्डन गिल यांनी केले आहे. या इमारतीला बांधण्यासाठी २०१५ मध्ये जेद्दा इकोनॉमिक कंपनीने अलिन्मा इन्वेस्टमेंट केले व त्याचबरोबर वित्त करार सुद्धा केले असल्याची माहिती मिळत आहे.

काहींनी असाही दावा केला आहे की, ही इमारत ढगांना ही स्पर्श करणार आहे. या इमारतीत २०० हून अधिक मजले असणार आहे. एका मजल्याचे क्षेत्रफळ २.४३ लाख चौरस मीटर, तर २१९२ फूट उंच असणार आहे. या इमारतीत ५५ सिंगल डेक लिफ्ट असणार आहेत, तर चार डबल डेक लिफ्ट असणार आहे. या इमारतीचे काम १० जानेवारी २०१५ ला सुरु करण्यात येणार आहे. आतापर्यंत ४७ मजले तयार झाले आहेत. बेसमेंटपासून ते ९२ मजल्यापर्यंत ऑफिस, पार्किंग व इतर गोष्टी असणार आहे. ११५ व्या मजल्या पासून ते १५६ व्या मजल्या पर्यत हॉटेल व रेस्टॉरेंट असणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा