बालासोर रेल्वे दुर्घटनेतील तपासाची सूत्रे आता सीबीआय कडे, अहवाल आल्यावर त्यावर बोलणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रतिक्रिया

मुंबई,५ जून २०२३ : ओडिशा मधील बालासोर येथे घडलेल्या रेल्वे अपघाता नेमका कशामुळे झाला याचा तपस आता सीबीआय तपासणार आहे. अपघात कसा झाला, अपघाताचे कारण काय हे शोधून काढण्यासाठी आता या अपघाताच्या तपासाची सूत्र सीबीआयकडे देण्यात आली आहे. अपघाताचे कारणे मिळाली आहेत, मात्र अहवाल आल्यावरच त्यावर बोलणार, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

या अपघातामागे इंटरलॉकिंग सिग्नलचा बिघाड कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु रेल्वेकडून तसे कोणतेही ठोस कारण दिलेले नसल्याचे दिसून येत आहे. तर रल्वेमंत्री म्हणत आहेत अपघाताचे कारण समजले आहे. दोषी देखील समोर आले आहेत परंतु चौकशी अंती सर्व समोर येईल. रेल्वेचे अधिकारी सांगतायेत कारण समजले आहे, परंतु ते प्राथमिक अवस्थेत असून या अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे. परंतु हा एवढा मोठा रेल्वे अपघात रूळावरून डबे घसरून झाला की दोन रेल्वे एकमेकांना धडकून झाला. याबाबत रेल्वेकडे अद्याप कोणतीही माहिती नाही.

दरम्यान बालासोर येथील रेल्वे अपघात दोन जूनला सायंकाळी झाला. यानंतर तब्बल ५१ तासांनी एका रेल्वे रुळाच्या लाईनचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत पहिली रेल्वे मालगाडी गाडी या रुळावरून सुरू करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा