दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार जेपी ड्यूमिनीची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार जेपी ड्यूमिनीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

ड्युमिनीने मागच्या वर्षी विश्वचषकानंतर आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र त्यानंतर तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत होताच, त्याचबरोबर तो ग्लोबल कॅनडा टी20 लीग आणि कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला होता. मात्र आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील तरुण खेळाडूंशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्याचा ड्युमिनीचा विचार आहे.

यावेळी ड्युमिनी याने सांगितले की, मी अजूनही क्रिकेट खेळून भरपूर पैसे कमाऊ शकतो.परंतु यामुळे माझ्या आयुष्यातला उद्देश संपुष्टात येईल.आयुष्यात नवीन मार्गावर चालण्याआधी जुना मार्ग सोडावा लागेल, यासाठी मी निवृत्तीचा निर्णय घेत आहे.दक्षिण आफ्रिकेतील तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन देत तयार करणे हे माझे उद्दिष्ट आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा