अटीतटीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९ धावांनी विजय

5

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२२ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एक दिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना काल लखनऊ मध्ये खेळला गेला, या सामन्यात आफ्रिकेने ९ धावाने भारताचा पराभव केला. पावसामुळे हा सामना ४०-४० ओव्हरचा खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकेने ४० ओव्हर मध्ये ४ बाद २४९ रन्स केले, प्रत्युत्तरात भारताला ४० षटकार ८ बाद २४० धावांपर्यंतच मजल मारता आली.

दरम्यान भारतीय कर्णधार शिखर धवनणे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, प्रथम फलंदाजासाठी मैदानात उतरणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर मलान आणि डी कॉक यांनी पहिल्या विकेट साठी ४९ धावांची सलामी भागीदारी दिली. मलान बाद झाल्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बउमा ही लवकर बाद झाला, त्यांच्यापाठोपाठ एडन माक्रामलाही कुलदीप यादव ने शून्यावर बाद केलं, त्यानंतर डीकॉक हा देखील ४८ धावा करून बाद झाला. डीकॉक बाद झाल्यानंतर आफ्रिकेची परिस्थिती ४ बाद ११० अशी होती. यानंतर डेव्हिड मिलर ६३ चेंडूत ७५ आणि हेनरिक क्लासन ६५ चेंडूत ७४ यांनी १३९ धावांची शतकिय भागीदारी रचत भारतासमोर २५० धावांचे आव्हान दिले.

प्रत्युत्तरात २५० धावांचं लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात देखील खराब झाली. शुभमन गिल अवघ्या ३ धावा करून माघारी परतला, तर शिखर धवनने ४ धावा केल्या, त्यानंतर ऋतुराज गायकवाड सुद्धा १९ धावा करून आऊट झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यर ने धडाकेबाज फटकेबाजी केली,आणि अर्धशतक झळकावले पण त्यानंतर श्रेयस अय्यर ही आऊट झाला. संजू सॅमसन आणि शार्दुल ठाकूर हे काहीकाळ खेळपट्टीवर होते मात्र शार्दुल माघारी परतल्यानंतर सॅमसनने एकाकी झुंज दिली. अखेर च्या ओव्हरमध्ये संजू ने सामना जिंकण्या साठी पुरेपूर प्रयत्न केला, मात्र भारताचा ९ धावांनी पराभव झाला. संजू सॅमसन ने ६३ चेंडूत ८६ धावंची नाबाद खेळी खेळली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा