दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू डेविड मिलर वर दुःखाचा डोंगर

पुणे, ९ ऑक्टोबर २०२२ : क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा खेळाडू डेव्हिड मिलर वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डेव्हिड मिलर ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर एका मुलीचा फोटो शेअर करत भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहिले आहे, त्याने त्या पोस्टमध्ये लिहिले की ‘RIP माझी लेक मी तुला नेहमी मिस करेन असं म्हटलं आहे.

या पोस्टमुळे अनेकांना वाटले की डेव्हिड मिलरच्या मुलीचे निधन झालं आहे, पण असं नाही आहे. मिलर ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आणि पोस्ट मध्ये, त्याची मुलगी नसून त्याची सर्वात मोठी चाहती आहे. तीचं एनी अस नाव आहे, ती त्याच्या मुलीसमान आहे काल रात्री तिचं निधन झालं आहे. याबद्दल स्वतः मिलरने एक भावूक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

दरम्यान डेव्हिड मिलर हा भारतीय दौऱ्यावर असून, हा दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज भारताविरुद्ध दमदार प्रदर्शन करत आहे. त्याने दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यांत नाबाद १०६ धावांची शतकिय खेळी केली होती, याव्यतिरिक्त भारतीय संघाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ७५ धावांची धडाकेबाज खेळी केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा