गोल पोस्ट इतर साउथ सुपरस्टार महेश बाबू यांच्या आईचं निधन

साउथ सुपरस्टार महेश बाबू यांच्या आईचं निधन

पुणे, २८ सप्टेंबर २०२२ : साउथ सुपरस्टार महेश बाबू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आज पहाटे ४ सुमारास त्यांच्या आईचं निधन झालंय. हैदराबाद मधील एआयजी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मीडिया रिपोर्टनुसार अशी माहिती समोर आलीय. की गेल्या काही आठवड्यापासून इंदिरा देवी यांची तब्येत खराब होती त्याच्यावर हैदराबाद येथील एआईजी रुग्णालयात उपचार सुरू होते.

महेश बाबू यांच्या आई इंद्रा देवी यांचं पार्थिव पद्यालय स्टुडिओमध्ये सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. महेश बाबू यांच्या आईचं निधनाचं वृत्त समजताच अनेक दक्षिणात्य कलाकारानी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली. “श्रीमती इंद्रा देवी यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून फार दुःख झाले. इंद्र देवी माता यांच्या आत्म्याला शांती देवो मी सुपरस्टार कृष्णा, भाऊ महेश यांच्या कुटुंबाप्रप्ती संवेदना व्यक्त करतो” असे ट्विट मेगास्टार चिरंजीवी यांनी केले आहे.

इंद्रा देवी यांना तीन मुली आणि एक मुलगा( महेश बाबू) असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांचं यावर्षी जानेवारी महिन्यात निधन झालं. महेशच्या कुटुंबियासाठी या वर्षातील हा दुसरा मोठा धक्का आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version