चेन्नई, ९ डिसेंबर २०२०: साउथ चित्रपट अभिनेत्री व्ही.जे. चित्रा ही बुधवारी सकाळी हॉटेलच्या खोलीत मृत अवस्थेत आढळली. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण आत्महत्येचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. व्ही.जे. चित्रानं रात्री उशिरा शूटिंग केल्याचं सांगण्यात येत आहे. शूटिंगनंतर तिनं आपल्या होटेल रूम मध्ये चेक इन देखील केलं होतं. पण, नंतर हॉटेलच्या रिसेप्शनिस्टला तिच्या मृत्यूची माहिती मिळाली आणि त्वरित पोलिसांना याबाबत कळविण्यात आलं.
व्ही.जे. चित्राचं निधन
व्ही.जे. चित्रा ला सिरियल पांडियन स्टोअरसाठी ओळखलं जातं. त्या मालिकेत ती बऱ्याच काळापासून मुलई या पात्राची व्यक्तिरेखा साकारत होती. त्या मालिकेमुळं तिची लोकप्रियता इतकी वाढली होती की, लोकं अजूनही तिला मुलई नावानं ओळखतात. पण, आता या अभिनेत्रीचं निधन झालं आहे. तिच्या जाण्यानं संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
ऑगस्ट मध्ये झाला होता साखरपुडा
सुरुवातीच्या तपासात हे निश्चितच आत्महत्येचं प्रकरण सांगितलं जात आहे, परंतु, पोलिसांच्या तपासणीनंतरच नक्की काय घडलं हे समोर येईल. चित्राचं कुटुंबही चेन्नईमध्ये राहत असल्याची माहिती आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये तिचा साखरपुडा बिझनेस मॅन हेमंत रवी यांच्याशी झाला होता. अशा परिस्थितीत चित्राच्या आत्महत्येची घटना सर्वांनाच आश्चर्य टाकत आहे. आतापर्यंत चित्राच्या कुटूंबाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तसंच हेमंत कडूनही काही सांगण्यात आलं नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे













































