सपाचे संस्थापक मुलायमसिंह यांची प्रकृती चिंताजनक; पीएम मोदींनी केली फोनवरुन विचारपूस

लखनौ, ३ ऑक्टोबर २०२२: समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांना व्हेंडिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्ला एक महिन्यापासून ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

त्यांना यूरिन इन्फेक्शन झाले आहे व रक्तदाबही वाढला आहे. तर शरीरातील ऑक्सिजन लेवलही कमी झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे . त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. पण काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं दिसून आले. ताबडतोप त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले.

हे समजताच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, डिंपल यादव, शिवपाल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मूख्यमंत्री योगी आदीत्यनाथ, काँग्रेस नेत्या प्रियकां गांधी या सर्वांनी मूलायमसिंह यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

अखिलेश यादव यांनी फोनकरुन चर्चो केली आहे आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांच्या सोबतही बोलून प्रकृतीची माहिती घेतली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे की, आम्ही त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेउन आहोत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा