उत्तर प्रदेश (संभल), दि. १९ मे २०२०: उत्तर प्रदेशमधील संभळ जिल्ह्यात समाजवादी पक्षाच्या नेत्याचीे आणि त्यांच्या मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गावात रस्ता बांधल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. हि घटनेचा थेट व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्ला केल्यावर आरोपी फरार झाला आहे.
प्रकरण संभळ जिल्ह्यातील बहजोई पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील समसोई गावात रस्त्यावरुन दोन्ही पक्षात वाद झाला. सपा नेत्यांची पत्नी ग्रामप्रधान आहे. गावात रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे, याला काही लोकांचा विरोध होता. हा वाद इतका वाढला की बंदुका बाहेर आल्या. या वेळी सपा नेते छोटा लाल दिवाकर आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या मुलाला गोळ्या घालण्यात आल्या.
आरोपी गोळीबार करीत असताना बरीच लोक तिथे हजर होती. लोकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलवर शूट केला. या व्हिडिओमध्ये आरोपी नेमबाजी करताना स्पष्ट दिसत आहेत. सध्या पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे, परंतु खुनाचा मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीतून फरार आहे.
छोटे लाल विधानसभा निवडणुकीत सपाचे उमेदवार ही होते. पत्नी सध्या गाव प्रमुख आहे. या घटनेनंतर परिसरातील राजकारण तापले आहे. जिल्ह्यातील उच्च अधिकारीही घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. सपा नेत्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना कळविण्यात आले पण उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप परिवाराने केला आहे. सध्या गावातील तणावाचे वातावरण पाहता पीएसी तैनात करण्यात आली आहे.
सपाने योगी सरकारला घेराव घातला
या घटनेवर समाजवादी पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षाने ट्विट करून म्हटले आहे की, ‘किलर सरकार! भाजपाने संरक्षित केलेले गुंड जनतेचा आवाज उठवणाऱ्यावर हल्ला करीत आहे! संभलचे दलित नेते आणि चंदौसीचे माजी सपाचे विधानसभा उमेदवार, छोटे लाल दिवाकर यांच्यासह त्यांच्या मुलाची हत्या ही खेदजनक आहे! कुटूंबियांना सहानुभूती, मारकऱ्यांना अटक, न्याय!
न्यूज अनकट प्रतिनिधी