स्पा सेंटर च्या नावाने चालणाऱ्या सेक्स रॅकेट चे भांडाफोड.

116

मुंबई: मुंबई मधील दादर परिसरातील भागात असणाऱ्या उच्चभ्रू परिसरातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.स्थानिक पोलीसांना कळू न देता हे स्पा सेंटर गेले कित्येक दिवस झाले एका रहिवासी ईमारती मध्ये चालले होते तरी स्पा सेंटर च्या नावाखाली चालणाऱ्या प्रकाराला अमली पदार्थ विरोधी पथकाने उघडकीस आणले. आश्चर्याची बाब म्हणजे या ईमारतीत माजी पोलीस अधिकारी, राजकीय नेते आणि अनेक प्रसिद्ध खेळाडू राहत आहेत. स्थानिक पोलीसांना या बाबतीत माहिती मिळून देखील त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. मात्र मिळालेल्या खबरी च्या माहीती च्या मदतीने अमली पदार्थ विरोधी पथकाने या इमारती मध्ये धाड टाकून या स्पा सेंटर च्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेट चा भांडाफोड केला.
दादरमधील प्रभादेवी परिसरातील उच्चभ्रू नावाच्या इमारती घडलेल्या ही घटना आहे. या इमारती मध्ये माजी पोलीस अधिकारी, राजकीय नेते तसेच इतर सुशिक्षित लोक राहायला आहेत. खबरी कडून मिळालेल्या माहितीच्या मदतीने शुक्रवारी रात्री अमली पदार्थ विरोधी पथकाने या इमारती मध्ये धाड टाकली आणि स्पा सेंटर च्या नावाखाली चालणाऱ्या या सेक्स रॅकेट चा धक्कादायक भांडाफोड केला.
मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ विरोधी पथक वेगवेगळ्या कारवाई करत आहे, यात अंतर्गत तपास करत असताना या स्पा सेंटर चा खुलासा झाला. अमली पदार्थ विरोधी पथकाने या प्रकरणामध्ये अटक केलेल्या मुख्य आरोपी चे नाव सलीम शेख अाहे,तसेच या प्रकरणात एकूण नऊ मुलींची सुखरूप सुटका केली, आणि ह्या सगळ्या प्रकरणात महत्वाची भूमिका सांभाळणाऱ्या काही मुलींना सुद्धा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाने या इमारती मध्ये धाड टाकून जवळपास साडे बारा हजार रुपयांची रक्कम सुद्धा जप्त केली आहे. पिटा अॅक्ट प्रमाणे या प्रकरणावर कारवाई करण्यात आली असून सर्व मुलींना शिवडी न्यायालयात काल हजर करण्यात आले. तसेच मुख्य आरोपी सलीम शेख ला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.