फ्लोरिडा, दि. ३१ मे २०२०: शनिवारी इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीने तयार केलेल्या रॉकेट जहाजाने अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जात असताना नासाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन यशस्वीरित्या उड्डाण केले आणि व्यावसायिक अंतराळ प्रवासात नव्या युगाची सुरुवात झाली.
नासाचे अंतराळवीर बॉब बेहनकेन आणि डग हर्ली यांना घेऊन जाणारे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन यान शनिवारी दुपारी ३.२२ वाजता नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून लॉन्च करण्यात आले.
स्पेस एक्स ही पहिली कंपनी ठरली आहे जीने मानवरहित अंतराळयान अंतरिक्ष मध्ये पाठवले आहे. याआधी मानवासहित अंतरामध्ये उड्डाण घेणारे केवळ तीनच देश होते त्यामध्ये अमेरिका, रशिया, आणि चीन या देशांचा सहभाग आहे.
स्पेस एक्स ने सोडलेले हे यान अमेरिकेच्या दोन्ही अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर पोहोचवणार आहे. यापूर्वी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर जाण्यासाठी अमेरिका रशियाची मदत घेत असे. अमेरिका आणि रशिया यांचे संबंध फारसे चांगले नसले तरी अंतराळ मोहिमेसाठी अमेरिकेला रशियाची मदत गेल्या दहा वर्षापासून घ्यावी लागत होती.
अमेरिकेचे डिस्कवरी हे स्पेस शटल कालबाह्य झाल्यानंतर अमेरिका पूर्णपणे रशियावर अवलंबून होता. गेली दहा वर्षे नासा असे यान बनवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु स्पेस एक्स या प्रायव्हेट कंपनीने हे काम अवघ्या काही वर्षात करून दाखवले आहे. इलॉन मस्क यांचे स्वप्न आहे की मानवाला मंगळवार पोहोचवावे व व्यवसायिक अंतराळ उड्डाणे सुरू करावीत. असे म्हटले जात आहे की या यशस्वी उड्डाणानंतर आता व्यवसायिक अंतराळ उड्डाणाकडे वेगाने वाटचाल सुरू होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी