स्पेनचे राष्ट्राध्यक्ष कोरोना पाॅझिटिव्ह, जी-20 परिषदेला राहणार गैरहजर

नवी दिल्ली, ८ सप्टेंबर २०२३ : उद्यापासून दोन दिवस होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी देशाची राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. ही परिषद ९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत पार पडणार आहे. यामध्ये जगभरातील २८ हून अधिक देशाचे प्रमुख सहभागी होणार आहेत. दरम्यान स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ हे कोरोना पाॅझिटिव्ह झाल्याने दिल्लीतील परिषदेत ते सहभागी होणार नाहीत. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.

त्यांनी सांगितले की, काल दुपारी माझी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जी -20 शिखर परिषदेसाठी मी नवी दिल्लीला जाऊ शकणार नाही. सध्या मला बरे वाटत आहे. ते पुढे म्हणाले की, त्यांच्या जागी स्पेनच्या उपराष्ट्रध्यक्ष नादिया कॅल्व्हिनो आणि आर्थिक व्यवहार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री हे, युरोपियन युनियन आणि सहकारी यांच्याद्वारे जी -20 शिखर परिषदेत प्रतिनिधित्व करतील.

दिल्लीत होत असलेल्या जी 20 परिषदेला अनुपस्थित राहणारे स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रोसांचेझ हे तिसरे जागतिक नेते आहेत. यापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जी 20 परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले होते. भारताच्या अध्यक्षतेखाली पहील्यांदाच जी 20 शिखर परिषद होत आहे. या कार्यक्रमाला अनेक जागतिक नेते आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत. जागतिक नेत्यांच्या उपस्थितीमुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा