गोल पोस्ट समाजकारण शौचालय दिनानिमित्त पालघर मध्ये विशेष अभियान

शौचालय दिनानिमित्त पालघर मध्ये विशेष अभियान

पालघर, १९ नोव्हेंबर २०२० : जागतिक शौचालय दिनाच्यानिमित्तानं पालघरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या २७ तारखेपर्यंत एक विशेष अभियान राबवलं जाणार आहे.

जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता , शाळा आणि अंगणवाडीत शौचालयांची निर्मिती तसंच त्यांची देखभाल दुरुस्ती याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत मिशन, ग्रामीणच्या दुसऱ्या टप्याअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या अभियानाची अंमंलबजावणी करण्यात य़ेत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version