गोल पोस्ट पुरस्कार सुधाकर खोत यांचा सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार..

सुधाकर खोत यांचा सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार..

माढा दि.३० नोव्हेंबर २०२० माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील रेल्वे प्रशासनात सिनियर टेक्नीशियन पदावर चाळीस वर्षे प्रदीर्घ सेवा बजावून सुधाकर खोत यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेंट्रल रेल्वे वर्कशॉप,ओबीसी कामगार संघटना नॅशनल रेल्वे मजदूर युनियन शाखेच्या वतीने सत्कार समारंभ करून निरोप देण्यात आला

याप्रसंगी असिस्टंट वर्कशॉप मॅनेजर सुनील कुमार रिटायर्ड ऑफिसर सूर्यकांत जाधव नगराध्यक्ष समीर मुलाणी नगरसेवक चंद्रकांत वाघमारे संभाजी सातव ग्रा.पं.सदस्य साजिद शेख कुस्तीसम्राट अस्लम काझी डॉ.आशिष रजपूत दिपक जानराव सदानंद नवगिरे मोहन खंडाळे सुनील शिंदे सत्तार शेख बंडु डांगे सईद शेख दीपक शिंदे नशीर शेख अनिल शेलार पप्पू तांबोळी मोहसीन शेख उपस्थित होते

या सेवानिवृत्ती नंतर गणेश नगर मित्र मंडळ,सम्राट अशोक नगर,धाडस ग्रुप आझाद ग्रुप,रेल्वे कॉलनी फ्रेंड सर्कलच्या वतीने मानाचा फेटा श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version