झारखंड विधानसभेचं आज विशेष अधिवेशन, हेमंत सोरेन सरकार आणणार विश्वासदर्शक ठराव

रांची, ५ सप्टेंबर २०२२: झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. सोरेन सरकार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी सत्ताधारी यूपीएच्या सर्व आमदारांना रविवारी संध्याकाळी छत्तीसगडमधील रायपूर येथून झारखंडला परत बोलावण्यात आलं असून त्यांना रांचीच्या सर्किट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या आमदारांची बैठक घेतली.

हेमंत सोरेन सरकारला ४९ आमदारांचा पाठिंबा आहे. ८१ सदस्यांच्या सभागृहात सर्वात मोठा पक्ष असलेल्या JMMकडं सध्या ३० आमदार आहेत, काँग्रेसचे १८ आणि RJD कडे एक, तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे २६ आमदार आहेत. दरम्यान, सोरेन यांनी आमदारकी सोडल्याने हालचालींना वेग आला होता, विरोधक सरकार पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार करण्यात व्यस्त आहेत. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाआघाडीच्या सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये एकत्र ठेवण्यात आलं होतं.

भाजपने आमदारांसह रणनीती तयार केली

दुसरीकडं भाजपनेही रविवारी संध्याकाळी उशिरा आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावलीय. ज्यामध्ये आज होणाऱ्या विशेष अधिवेशनासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत अनेक प्रकारच्या सूचना आमदारांना दिल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, सर्व आमदारांना अधिवेशनात सक्तीने सहभागी होण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सीएम सोरेन यांनी भाजपवर साधला निशाणा

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधताना विरोधकांचे मनसुबे उधळले जातील असे सांगितलं. दुमका घटना आणि सप्टेंबरमध्ये बोलावण्यात येणाऱ्या विशेष अधिवेशनावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्ताधारी आघाडीकडे पूर्ण बहुमत असल्याचं ते म्हणाले. काळजी करण्यासारखे काही नाही. ते म्हणाले की, विरोधक (भाजप) आमच्यासाठी रचलेल्या जाळ्यात अडकतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा