भरधाव कंटेनर हार्डवेअरच्या दुकानात घुसला, सुदैवाने जीवित हानी नाही

जालना १० जानेवारी २०२४ : छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे येत असलेला MH 21 X 0947 नंबरचा कंटनेर बदनापूर शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका हार्डवेअरच्या दुकानात घुसल्याने दुकानाचे मोठे नुकसान झालेय. सदरील कंटेनर छत्रपती संभाजीनगरहून जालनाकडे येत असताना समोरून वाळु घेऊन जाणारा ट्रॅक्टर चुकीच्या बाजूने येत असल्याचे दिसल्याने ट्रॅक्टरला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनर पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या हार्डवेअरच्या दुकानात घुसला.

दुकानाच्या बाजूला शेडमध्ये उभी असलेली कार व शेडचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सोबतच सिमेंट विटा देखील तुटल्या असून विटांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. भरधाव कंटेनर पलटी झाल्याने कंटेनरच्या पाठीमागचा भाग वेगळाच झाला. या घटनेमुळे बदनापूर शहरात एकच धावपळ उडाली. रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून कंटेनर आणि दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून चुकीच्या बाजूने जाणारा वाळूचा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा