मुंबई, १८ ऑगस्ट २०२०: आयपीएल २०२० साठी चिनी कंपनी विव्हो च्या जागी नवीन स्पॉन्सर कंपनी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामामधून विव्होला वगळल्यानंतर ड्रीम ११ ला यावर्षी आयपीएलची शीर्षक प्रायोजकत्व मिळाले आहे. आयपीएल २०२० च्या हंगामात ड्रीम ११ ने प्रायोजकत्व अधिकार २५० कोटींमध्ये खरेदी केले आहेत.
ही बोली विव्होच्या वार्षिक ४४० कोटींपेक्षा १९० कोटी ने कमी आहे. टाटा ग्रुप ही प्रायोजित अधिकार हक्कांच्या शर्यतीत सहभागी होता. यावर्षी १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आयपीएल रंगणार आहे.
यापूर्वी भारत आणि चीनमधील वाढत्या वादामुळे बीसीसीआयने या हंगाममधून विव्होला वगळलं होतं. २०१८ ते २०२२ पर्यंत पाच वर्ष २१९० कोटी रुपये (प्रत्येक वर्षी ४४० कोटी रुपये) साठी विव्होने आयपीएल शीर्षक प्रायोजकत्व अधिकार संपादन केले होते. पुढच्या वर्षी विव्हो मुख्य प्रायोजक म्हणून परत येऊ शकेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी