कर्जतकरांचा कर्जत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत ११ ऑगस्ट २०२० : आंबी जळगाव येथे ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ दि ११ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत शहर बंदची हाक देण्यात आली त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, पोलीस अधिकाऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली व आंदोलन मागे घेण्यात आले.

आंबी जळगाव खातगाव रस्ता बंद केल्याच्या कारणावरून सचिन लालासाहेब शेटे यांनी आंबी जळगाव येथील तीन शेतकऱ्यांवर हरिजन एक्टचा खोटा गुन्हा दाखल केला आहे, यावरून या तीन शेतक-यांना अटक ही करण्यात आली आहे या घटनेचा जाहीर निषेध करत सकल मराठा समाज यांच्या वतीने हा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी अत्यावश्यक सेवा वगळता कर्जत शहर बंद करण्यात आले.

सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक तानाजी पाटील, नानासाहेब धांडे, अँड धनराज राणे, अँड दीपक भोसले, राहुल नवले,श्रीराम गायकवाड, राम तोरडमल, विजय मोरे, सुनील यादव, डॉ. नितीन तोरडमल, महेंद्र धांडे, प्रसाद कानगुडे, सुदाम निकम, कुंडलिक निकम, दीपक यादव, अविनाश जाधव, आदींसह अनेकानी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन दिले, तर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे बरोबर चर्चा करण्यात आली. सातव यांनी या गुुन्हयाचा तपास दहा दिवसात पूर्ण करू असा शब्द दिल्यानंतर सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा