आहेरगांव (सोलापूर), दि. १७ जून २०२०: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आहेरगांव येथे कोरोना साथीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावामध्ये निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्यात आली.
जगभरात कोरोनाने थैमान घातलेले आहे. कोरोना सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिरकाव करत आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आहेरगांव ग्रामपंचायतचे सरपंच भागवत करंडे यांनी स्व:खर्चाने सोडीयम हायड्रोक्लोराईडची संपुर्ण गावामध्ये फवारणी करत स्वच्छतेला प्राधान्य देण्याचा संदेश दिला.
यावेळी गावातील नागरिकांनी कोरोना विषाणु संक्रमणाच्या संकटकाळात कोणती काळजी घेतली पाहिजे हे सांगितले. याप्रसंगी ग्रामसेवक सौ. बिनगे मॅडम, सुधीर जगताप, पत्रकार रोहित अजगर, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदिप पाटील